Wednesday, May 28, 2014

जग बदल घालूनी घाव

जग बदल घालूनी घाव, सांगून गेले आम्हा भीमराव

गुलामगिरीच्या या चिखलात, रुतून बसला का ऐरावत
अंग झाड़ुनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव, सांगून गेले…

धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले
मगराने जणु माणिक गिळले, चोर जाहले साव, सांगून गेले…

ठरवून आम्हाला हीन कलंकित, जन्मोजन्मी करुनी अंकित
जिणे लादुनी वर अवमानित, निर्मून हा भेदभाव, सांगून गेले…

एकजुटीच्या या रथावरती, आरूढ होऊनी चल बा पुढती
नव महाराष्ट्रा निर्मून जगती, करी प्रकट निज नाव, सांगून गेले…

- अण्णाभाऊ साठे

No comments:

Post a Comment